सातारा परीसर येथील श्रीयश प्रतिष्ठान संचलित श्रीयश तंत्रनिकेतनमध्ये श्रीयश तंत्रनिकेतन आणि आंतर अभियांत्रिकी पदविका विदयार्थी क्रिडा संघटना (आय.ई.डी.एस.एस.ए.) यांच्या संयुक्त विदयमाने दि. ३० जानेवारी ते ०२ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत विभागीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचा दि. ०२ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी ३:०० वा. पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाने उत्साहात समारोप करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून इं.भा. पाठक महिला महााविदयालयाच्या क्रिडा संचालिका, प्रा. मनिषा वाघमारे तसेच मा.डॉ.उत्त्तम काळवणे, संचालक, श्रीयश टेक्निकल कॅम्पस, प्रा. सौ. सिमा शेंडे, प्राचार्या, श्रीयश पॉलिटेक्निक, सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती. स्पर्धेचा अंतिम सामना श्रीयश तंत्रनिकेतन, औरंगाबाद आणि टी.बी.गिरवलकर तंत्रनिकेतन, अंबेजोगाई यांच्यात खेळविण्यात आला.

या स्पर्धेत श्रीयश तंत्रनिकेतन, औरंगाबाद यांनी १० षटकांत ७१ धावा करुन विजेतेपद पटकावले तर टी.बी.गिरवलकर तंत्रनिकेतन, अंबेजोगाई यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. विजयी खेळाडूंचा पाहूण्यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरव करण्यात आला. स्पर्धेत औरंगाबाद विभागातील विविध तंत्रनिकेतनमधील १६ संघानी आपला सहभाग नोंदवीला. स्पर्धा निपक्ष आणि निकोप वातावरणात पार पडली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. जितेंद त्रिभुवन आणि आभार प्रदर्शन प्रा विजय भोेरडे यांनी केले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

प्रा. विजय भोेरडे -९७६३१०६१०२