‘श्रीयश पॉलिटेक्नीकमध्ये तंत्रशिक्षण कार्यकम संपन्न’.

श्रीयश प्रतिष्ठान संचलित, श्रीयश पॉलिटेक्नीक, औरंगाबाद येथे म.रा.तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई प्रायोजित व नॅशनल इन्टिटयुट ऑफ टेक्नीकल टिचर्स टे्रनिंग व रिसर्च, भोपाळ यांच्या वतीने औरंगाबाद विभागातील शासकिय व खाजगी तंत्रनिकेतन महाविदयालयातील अधिव्याख्यात्यांसाठी दोन आठवडयांचा प्रशिक्षण कार्यकम दिनांक २२-०५-२०१७ ते ०२-०६-२०१७ पर्यंत आयोजित करण्यात आला होता.
त्यात विविधि कॉलेजमधील ४० अधिव्याख्यात्यात्यांनी सहभाग नोंदविला. भोपाल येथील NITTTR या संस्थेतील डॉ. व्ही.डी. पाटील, डॉ. पी.के. पुरोहित, डॉ. नितीश दुबे व डॉ. अतुल मिश्रा यांनी प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षण पुर्ण केलेल्या अधिव्याख्यात्यांना संस्थेचे संचालक डॉ. यु.बी. काळवणे, प्राचार्या सौ.सिमा एम. शेंडे याच्या हस्ते पमाणपत्र देउन गौरविण्यात आले. शेवटी प्राचार्या मॅडम यांनी MSBTE व NITTTR संस्थेचे प्रशिक्षकांचे आभार मानले.
हया प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. संतोष भोपळे यांनी मेहनत घेतली.