श्रीयश तंत्रनिकेतनमध्ये विभागीय कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

सातारा परीसर येथील श्रीयश प्रतिष्ठान संचलित श्रीयश तंत्रनिकेतनमध्ये श्रीयश तंत्रनिकेतन आणि आंतर अभियांत्रिकी पदविका विदयार्थी क्रिडा संघटना  (IEDSSA) यांच्या संयुक्त विदयमाने दि. १७ व १८ जानेवारी या कालावधीत विभागीय कबड्डी स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचा  दि. १८ जानेवारी २०२० रोजी दुपारी ३:०० वा. पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाने उत्साहात समारोप करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून श्री. अनिलकुमार घारळे मुख्यध्यापक शिवाजी हायस्कूल राजनगांव, संस्थापक अध्यक्ष ओंकारे बालक आश्रम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.प्रभाकर माशाळकर, संचालक, श्रीयश टेक्निकल कॅम्पस तसेच  सौ. सिमा शेंडे, प्राचार्या, श्रीयश पॉलिटेक्निक, डॉ. रामकिसन पवार, प्राचार्य, श्रीयश अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालय तसेच सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती. स्पर्धेचा अंतिम सामना शासकीय तंत्रनिकेतन, बीड आणि शासकिय तंत्रनिकेतन, औरंगाबाद यांच्यात खेळविण्यात आला.
या स्पर्धेत चार गुणांनी शासकिय तंत्रनिकेतन, बीड यांनी यांनी विजेतेपद पटकावले तर शासकिय तंत्रनिकेतन, औरंगाबाद यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. विजयी खेळाडूंचा पाहूण्यांच्या हस्ते पारितोषिक देवून  गौरव करण्यात आला. स्पर्धेत औरंगाबाद विभागातील विविध तंत्रनिकेतनमधील १८ संघानी आपला सहभाग नोंदवीला. स्पर्धा निपक्ष आणि निकोप वातावरणात पार पडली.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा विजय भोेरडे आणि आभार प्रदर्शन प्रा. परशुराम कु-हे  यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी प्रा. निलेश आठवले, प्रा. संभाजी साठे यांनी प्रयत्न केले आहेत.