श्रीयश पॉलिटेक्निकमध्ये तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा संपन्न
सातारा परीसर येथील श्रीयश प्रतिष्ठान संचलित श्रीयश पॉलिटेक्निक आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विदयमाने गुरुवार, दिनांक १५/०६/२०१७ रोजी सकाळी १०:३० वा. स्थळित तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख उदघाटक म्हणून मा. श्री. डी. एम. मुगळीकर (आयुक्त, महानगरपालिका, औरंगाबाद) तर कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री .बसवराजजी मंगरुळे, अध्यक्ष, श्रीयश प्रतिष्ठान, तसेच डॉ. आनंद पवार, उपसचिव, म.रा.तंत्रशिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय, औरंगाबाद, मा.श्री.मोहन मानकर, सहायक सचिव, म.रा.तंत्रशिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय, औरंगाबाद, इंजि. शिवप्रसाद जाजू (पवन इंडस्ट्रीज), औरंगाबाद, श्री. आर.एन. खडसे, अधिव्याख्याता, शासकिय तंत्रनिकेतन, औरंगाबाद, मा.श्री.डॉ.उत्त्तम काळवणे, संचालक, श्रीयश टेक्निकल कॅम्पस, औरगाबाद, प्रा. सौ. सिमा एम. शेंडे, प्राचार्या, श्रीयश पॉलिटेक्निक, औरंगाबाद यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. डी. एम. मुगळीकर- १० वी नंतर पुढील शिक्षणाची योग्य दिशा ठरवणे महत्वाचे आहे. विदयाथ्र्यांनी आपला नैसर्गिक कल, आवड, क्षमता ओळखुन भविष्यातील शिक्षणांची निवड करावी. तंत्रज्ञानाचे क्षेत्र प्रगतीसाठी अनुकूल असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन उज्वल संधी मिळतात. आभियंता होउन राष्ट्र निर्मीतीच्या कार्यामध्ये आपण आपले योगदान देऊ शकतो. श्रीयश पॉलिटेक्निकने आयोजित केलेल्या या मेळाव्याचा सर्व विदयाथ्र्यांंनी लाभ घ्यावा.
श्री .बसवराजजी मंगरुळे, काही वर्र्षापुर्वी शिक्षणाच्या मर्यादित संधी उपलब्ध होत्या परंतू आत्त्ताच्या आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक संधी निर्माण झालेल्या आहेत. आवड,चिकाटी, अभ्यासातील सातत्य या बळावर विद़यार्थी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात यशस्वी होतात.
डॉ़ आनंद पवार, यांनी करियर कसे निवडावे या विषयी मार्गदर्शन केले़
श्री़.एम.व्ही. मानकर, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे स्पर्धेत टिकुन राहण्यासाठी गुणवत्त्ता महत्वाची आहे. विद्याथ्र्यांनी उज्वल भवितव्यासाठी निाश्चित ध्येय ठरवणे आवश्यक आहे.
श्री. शिवप्रसाद जाजु, तंत्रशिक्षणातील विविध संधी, याविषयी मार्गदर्शन केले.
श्री. आर. एन. खडसे, यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची माहीती दिली.
श्री. उत्त्तम काळवणे, यांनी श्रीयश प्रतिष्ठाण संस्थेत उपलब्ध असणारे अभ्यासक्रम, सोयी सुविधा याबद्दल माहीती दिली.
कार्य्क्रमाचे सुत्रसंचालन प्रा. जितेंद्र त्रिभुवन, तसेच आभारप्रदर्शन प्रा. संदीप खंडागळे यांनी केले. या मेळाव्यांतर्गत विविध महाविद्यालयातील अभ्यासक्रमांची माहीती देणारे स्टॉल लावण्यात आलेले होते. शहरातील १०वी, १२वी तसेच आय.टी.आय. उत्त्तीर्ण झाालेले बहुसंख्य विद्यार्थी या मेळाव्यास उपस्थित होते