I.D.E.S.S.A-2016 (Sports-Cricket)
श्रीयश तंत्रनिकेतनमध्ये विभागीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
सातारा परीसर येथील श्रीयश प्रतिष्ठान संचलित श्रीयश तंत्रनिकेतनमध्ये श्रीयश तंत्रनिकेतन आणि आंतर अभियांत्रिकी पदविका विदयार्थी क्रिडा संघटना (आय.ई.डी.एस.एस.ए.) यांच्या संयुक्त विदयमाने दि. २० ते २३ जानेवारी २०१६ या कालावधीत विभागीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. २० जानेवारी २०१६ रोजी सकाळी १०:३० वा. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येईल. आंतर अभियांत्रिकी पदविका विदयार्थी क्रिडा संघटना (आय.ई.डी.एस.एस.ए.) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धा निपक्ष आणि निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी क्रिकेट खेळातील नामवंत पंच, तज्ञ यांना निमंत्रित करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी औरंगाबाद विभागातील विविध तंत्रनिकेतनमधील जवळपास २० संघाची नोंदणी झालेली असून महाविदयालय स्तरावर स्पर्धेची जय्यत तयारी चालू आहे. प्रा. श्रीशैल्य पाताळे हे स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. अशी माहिती प्राचार्या सौ. सिमा एम. शेंडे यांनी दिली.