श्रीयश पॉलिटेक्निक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन
श्रीयश पॉलिटेक्निक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2016
सातारा परीसर येथील श्रीयश प्रतिष्ठान संचलित श्रीयश पॉलिटेक्निकमध्ये दिनांक ०९ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी १०: ३० वा. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव, मा.पी.यु.वायसे, सहाय्यक सचिव, मा. एम.व्ही. मानकर व न्यु इंग्लिश हायस्कुलच्या मुख्याध्यापिका श्रीमती. बीना थॉमस या मान्यवरांच्या हस्ते उदघाटनाचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी श्रीयश टेक्नीकल कॅम्पसचे संचालक डॉ. यु. बी. काळवणे, प्राचार्या, सौ. सिमा शेंडे, सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती. कार्यकमाच्या प्रस्तावीकातुन प्राचार्या, सौ. सिमा शेंडे यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजना मागची भुमिका विशद केली. ९० गटातील ३१५ विदयाथ्र्यांनी हरीत स्मार्ट सिटी, मानव रक्तभिसरणक्रिया, वाहतूक दिशादर्शक, ठिबक सिंचन, अग्निबाण, हायड्रोलिक पॉवर, पवन उर्जा, सौर उर्जा, वृक्षतोडीचे दुष्परीणाम, ग्लोबल वार्मिग, सांड पाणी व्यवस्थापन, हरीतगृह, दुष्काळी परिस्थिती या सारख्या विविधांगी विषयावर आपल्या प्रकल्पाव्दारे सादरीकरण केले.
मा.पी.यु.वायसे यांनी विदयार्थी आणि विज्ञान यांच्यातील कुतूहल आणि शोध हे नातं स्पष्ट करतांना विदयाथ्र्याच्या जिज्ञासू वृत्त्तीवर प्रकाश टाकला.मा. एम.व्ही. मानकर यांनी विदयाथ्र्यांच्या अंगभूत गुणांचा अविष्कार साकारण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्ल श्रीयश पॉलिटेक्निकला धन्यवाद दिले. तदनंतर न्यु इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती. बीना थॉमस यांनी मार्गदर्शन केले. कॅम्पसचे संचालक डॉ. यु. बी. काळवणे, यांनी विदयाथ्र्यांना श्रीयशच्या प्रशासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची हमी दिली. शुक्रवार दिनांक ०९.१२.२०१६ रोजी २० शाळांतील जवळपास १६०० विदयाथ्र्यांनी प्रदर्शनास भेट दिली असून प्रदर्शन दुसNया दिवशी ही विदयाथ्र्यासाठी खुले असून सर्वांनी प्रदर्शनास भेट दयावी असे आवाहन प्राचार्या सौ. सिमा शेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विजय भोरडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. संदिप खंडागळे यांनी केले.